उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई | तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपुर्वी कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘सिंधुदुर्ग वादळाच्या सावटाखाली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला वाऱ्यावर सोडलं आहे. भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड त्यांची चर्चा होते’, असा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला आहे. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात, असा घणाघाती आरोप देखील निलेश राणे यांनी केला.
कोकणाने शिवसेनेला भरभरून मते दिली. मात्र शिवसेनेनं कोकणाला काय दिलं? आठ दिवस उलटले तरी नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. अधिकारी भीक घालत नाही. आठ-आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत, त्यामुळे शक्य असेल ती मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचवण्याचं काम भाजप करत आहे, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं कारण काय असावं?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं”, महिलेचा विनयभंग करुन मारहाण
चार टप्प्यात राज्यातील लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य
“लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्या”
बायकोचे आपल्या मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन्…
Comments are closed.