बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्या भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्यावंर चर्चा

सातारा |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांची दुष्काळ आणि मराठा, मुस्लिम आणि धनगर  आरक्षण या मुद्यावंर एक तास चर्चा झाली.

दुष्काळावरती मात करण्यासाठी सरकारने विदेशातील ‘इरमा’ सारख्या योजना राज्यात सुरु केल्या  पाहिजेत. तसेच मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाबाबतचे अडथळे लवकर दूर केले पाहिजेत, याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.  मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणात कसलाही अडथळा येणार नसल्याच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी उदयनराजे यांनी शरद पवारांची भेट घेऊन दुष्काळ आणि आरक्षण यावर चर्चा केली होती.

महत्वाच्या बातम्या

-चंद्रकांत खैरेंचे हर्षवर्धन जाधवांवर खळबळजनक आरोप

-उद्धव यांचा दुष्काळ दौरा… त्यात विकासकामाचे उद्घाटन अन् उत्साही कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल- उद्धव ठाकरे

-ममतांचा उलटा प्रवास सुरू; आता जनताच त्यांचं श्राद्ध घालेल- गिरिराज सिंह

-औरंगाबादचा पराभव हा फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझासुद्धा आहे- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More