प्रीतिसंगमावर उदयनराजे-शिवेंद्रराजेंची उपस्थिती, मात्र एकमेकांपासून दोन हात दूरच

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. मात्र एकमेकांपासून दोन हात दूरच राहिले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रीतिसंगमावर आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे छत्रपतींचे वंशज असले तरी दोघांमधून विस्तवही जात नाही. मध्यंतरीच आणेवाडी टोलनाक्यावरुन दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता.

दरम्यान, उदयनराजे भोसले कायमच पक्षादेश झुगारुन देत आले आहेत. जनता हाच आपला पक्ष आहे, असं ते नेहमी म्हणतात. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांना गोंजारुन घेतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळालं.