बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप उदयनराजेंवर नाराज? साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सातारा | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नैसर्गिक आणि राजकीय परिपुर्णता लाभलेल्या साताऱ्यात नेहमीच राजकीय वातावरण तापलेलं असतं. गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवरून साताऱ्यातील राजकारण (Satara BJP) पेटलं होतं. अशातच आता भाजप नेत्याच्या वक्तव्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी फलटणमध्ये एक मोठं वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील मंगळवारी फलटणच्या दौऱ्यावर होते. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) हे पुढच्या वेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) व्यक्त केली आहे.

विक्रम पावसकर यांच्या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता भाजप उदयनराजेंवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजे यांचा साताऱ्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजे समर्थक नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे आता उदयनराजे देखील भाजपवर नाराज असल्याचं दिसतंय.

दरम्यान, विक्रम पावसकर यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने आता साताऱ्यात चर्चेला उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“एकीकडे RSS समान नागरी कायद्यासाठी आग्रही, तर भाजप…”

“आम्हाला वाटत होते की बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊतांचे गुरु, पण खरे गुरु शरद पवारच”

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षासाठी तडीपार

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश राज्य शासनानं थोर महापुरुषांच्या यादीत करावा”

omicron मुळे मृत्यूचा धोका किती?; दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More