Top News

…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

सातारा | मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीये. शिवाय गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही असा आरोप त्यांनी केलाय.

उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येतेय. तसंच सरकार आणि वकिलांमध्ये समन्वय नाही असंच सिद्ध होतंय. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली असून सरकार या उद्रेकाची वाट पाहतेय की काय? जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

उदयनराजे पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत.”

महत्त्वाच्या बातम्या-

…मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

…तर उपसभापतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार- अशोक चव्हाण

शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले”

पॉवर-प्लेमध्ये हैदराबादच्या वॉर्नर आणि साहाने दिल्लीकरांना दणका देत केला मोठा पराक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या