सातारा | आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्या, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांना केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. लाखो वारकरी पंढरपुरात विठुमाऊलीला भेटण्यासाठी आले आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली असून मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा
-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!
-…असं झालं तर लवकरच भारतात आयफोनवर बंदी येणार!
-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं