Top News

“किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील”

पुणे | संजय राऊतांच्या बोलण्यानं मला काही फरक पडत नाही असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरच पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील. ते म्हणजे बिनपट्ट्याचे रस्त्यावर फिरणारे, असं म्हणत उदयनराजे यांनी संजय राऊतांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं महाराष्ट्रातील भाजपमध्ये गेलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?, असा सवाल करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होेतं.

दरम्यान, जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही निशाणा साधला.

ठळक बातम्या- 

‘जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा पवारांना टोला

“महंगाई जेब कांटे, भाजपा देश बांटे”

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या