बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना आपल्या जन्माच्या आधीपासूनच होता- उदयनराजे भोसले

सातारा | कोरोनामुळे देशात अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्याचं दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासुन सैनिक भरती होत नसल्यामुळे कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन तर्फे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. सैनिक भरतीची तयारी करणारे तरूण भरती होत नसल्यामुळे नाराज आहेत. याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक भेट दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना संबोधित करताना कोरोनाबाबत एक अचंबित करणार वक्तव्य केलं आहे. कोरोना हा आपल्या जन्माच्या आधीपासुनच होता, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. वास्तविक पाहता कोरोनाचा जो काळ होता आणि तो राहणार आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

तरूणांना उद्यनराजे यांनी काही सल्ले सुद्धा दिले आहेत. तुमच्याकडे जो मोबाईल फोन आहे त्याचा उपयोग पिक्चर पाहण्यापेक्षा जरा सायन्स वाचण्यासाठी करा, असंही उदयनराजे म्हणाले. जिल्हाप्रशासनाच्या हातात काही नाही हे सांगताना उदयनराजे यांनी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं उदाहरण दिलं आहे. बॉयफ्रेड तुझा का माझा गं? असं म्हणत धरल्या एकमेकींच्या झिंझ्या अन् तुंबळ हाणामारी, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, दोन वर्षांपासुन सैनिक भरती होत नसल्यामुळे मुलांची वयोमर्यादा वाढवुन देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावर उदयनराजे यांनी तुमच्या मागणीचा विचार होईल का नाही याबाबत शंका व्यक्त केली. तसेच या आंदोलकांना आश्वासन देताना उदयनराजे यांनी मी तुमच्या मागणीचा पाठपुरावा करेल, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सोमय्यांच्या अडचणी वाढल्या??, 72 तासांनंतरही माफी न मागितल्याने परबांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

“शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, त्यांना पक्षातून काढण्यात आलं”

“अनंत गीते काही चुकीचं बोलले नाहीत, ही आघाडी…”; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

‘…तर लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो’; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More