Top News सातारा

धूम स्टाईलप्रमाणे खासदार उदयनराजेंनी मारला बाईकने फेरफटका!

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांचे डायलॉग आणि रोखठोक स्वभाव या गोष्टी प्रत्येकाच्या परिचयाच्या आहेत. दरम्यान उदयनराजेंचा एक व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये उदयनराजे एका वेगळ्या अंदाजात दिसून आलेत.

हटके अंदाजासाठी लोकप्रिय असलेल्या उदयनराजे भोसले यांनी बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग केलीये. उदयनराजेंना बाईक सवारी करणंही फार पसंत आहे.

उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतात. असंच गुरुवारी एका कार्यकर्त्याने स्वत:ची कावासकी 800 ही बाईक उदयनराजेंना दाखवली. शिवाय त्याने राजेंकडे ही गाडी चालवून दाखवण्याचा आग्रह केला.

मग काय उदयनराजेंनी पहिला गेअर मारत गाडी स्टार्ट केली आणि अगदी धूमप्रमाणे बाईकने एक फेरफटका मारला. जलमंदिरापासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत उदयनराजेंनी मस्त दोन राऊंड मारले कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण केली.

महत्वाच्या बातम्या-

आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या