बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….

पुणे | अनेक वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूरचे राजे मराठा आरक्षण निमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली.

संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले भेटीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पुण्यातील औंध परिसरात झालेल्या या भेटीमध्ये दोन्ही राजेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली.

भेटीनंतर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही  उदयनराजेंनी दिला.

दरम्यान, आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत, संभाजीराजे यांच्या विचारांसोबत मी सहमत आहे. दोघांचे घराणे आणि विचार एकच आहे. भेट झाल्यामुळे मनापासून आनंद झाला आहे. 16 तारखेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. अशी प्रतिक्रियाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

थोडक्यात बातम्या – 

“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

रक्तदान केल्यानं शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणुन घ्या सविस्तर

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ अभिमानास्पद कार्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More