बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षण रद्द झाल्याने उदयनराजे आक्रमक; म्हणाले, “खासदार-आमदारांना…”

सातारा | राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे.  मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता आहे.

हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचं काय झालं हे विचारा, असं सांगतानाच जरी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? राज्य सरकार जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाबाधितांसाठी विरुष्काचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

पुण्यातील ‘त्या’ पोलिसाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, बुधवार पेठ कनेक्शन?

आता काही सेकंदात कळणार कोरोना चाचणीचा निकाल; मुकेश अंबानी बोलवणार इस्राईलची विशेष टीम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More