सातारा | साताऱ्यातून मी निवडणूक लढायला तयार आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हटलं आहे. भाजपनं यावेळेस रिपब्लिकन पक्षाला मदत करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याची त्यांनी सांगितलं आहे.
गेल्यावेळी भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सातारा लोकसभेची जागा दिली होती. त्यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
दरम्यान, मी स्वत: येथून निवडणूक लढण्यास तयार आहे. यावेळेसही भाजपने मला मदत करावी, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
-मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!
-बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!
-मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!
-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!