Top News

या अटींची पूर्तता झाल्यास उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशासंदर्भात संभ्रम कायम आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काल वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या समोर काही अटी ठेवल्या. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा आणि येत्या विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी, अश्या अटी उदयनराजेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत.

उदयनराजेंनी काही दिवसांपुर्वी आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांसोबत भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली. मात्र कार्यकर्त्यांनी मात्र भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला दिला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या