बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भररस्त्यात शंभुराज देसाई यांनी उदयनराजेंना केला मुजरा

मुंबई | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शंभुराज देसाई हे उदयनराजेंना मुजरा करताना दिसत आहेत.

शंभुराज देसाई कोल्हापूरला जात होते, त्यावेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने चालले होते, तेव्हा वाटेत शंभुराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडीही ताफ्यासोबत घेतली, त्यानंतर शिरूळ एमआयडीसी महामार्गावर उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली.

गाडीतून बाहेर आल्यावर शंभुराज देसाई यांनी भररस्त्यात उदयनराजे भोसलेंना मुजरा केला. हा क्षण फोटोत कैद झाला. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच उदयनराजे आणि शंभुराज देसाई हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी नेहमी एकमेकांचा आदर ठेवतात हे पुन्हा एकदा दिसून आलं.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यालाही शंभुराज देसाई यांनी चांगलंच सुनावलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

नवऱ्यानं कापलं बायकोचं ओठ आणि नाक; कारण ऐकून पोलीसही हादरले

सोशल मीडियाबाबत आमिर खाननं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात प्रवास करताय तर, कोरोनासंदर्भातील ‘हे’ नवे नियम पाळणं बंधनकारक!

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More