खासदार उदयनराजे सातारा पोलिसात हजर

सातारा | न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले अखेर पोलिसात हजर झाले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांनी हजेरी लावलीय. 

लोणंद येथील कंपनी मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

दरम्यान, उदयनराजे स्वतः पोलिसात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या