Top News

“…नाहीतर त्या लेखक गोयलला दाखवलं असतं राजेशाही काय असते”

सातारा | लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयलला दाखवलं असत राजेशाही काय असते, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले म्हणाले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.

छत्रपती शिवरायांशी तुलना या पृथ्वीतळावर कोणाशीही होऊ शकत नाही तसेच जाणते राजे ही छत्रपती शिवरायच. संपूर्ण देश छत्रपतींच्या विचाराचा वारस, असंही उदयनराजे भोसलेंनी खडसावून सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं भाजपला चांगलंच महागात पडलं आहे. भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात वाद उफाळला आहे.

देशभरात वाद माजवलेल्या जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन उदयनराजे भोसले यांनी टीका केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या