बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत”

मुंबई | गेल्या दोन चार दिवसांपासून पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. राज्यातील त्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड कोसळून अनेकांचे प्राण गेले आहेत. या अस्मानी संकटाच्या रूपाने काळाने लोकांवर घाला घातला आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संकटातील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणं आवश्यक असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

कोणीही खचुन जावू नका, निसर्गाने संकटे दिली तरी त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखिल निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगड़ी पचास वा उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे म्हणून सावधानता बाळगुन संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठीआम्ही स्वतःतातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करत असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

दरम्यान, दरड कोसळन्याच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 3 जिल्ह्यात 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापूजा करावी, 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती दूर होईल”

रायगड, रत्नागिरीसह नुकसानग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारची आर्थिक मदत; निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ वर्ग

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

महाड व तळीये गाव वसवण्याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More