Loading...

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पुण्यात पार पडलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ‘सरकारनामा’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

खंडाळ्यातील सोना अलाईज कंपनीच्या मालकास खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी उदयनराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे ते अज्ञातवासात आहेत. मात्र सध्या ते भाजपच्या संपर्कात असून नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचं समजतंय. 

Loading...

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

Loading...