…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात
मुंबई | खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘कृष्णकुंज’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन कृष्णकुंजवरील भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले. उदयनराजेंनी पहिल्यांदाच कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट होत असल्याची चर्चा रंगली होती.
उदयनराजेंच्या राजभेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली, अशी माहिती मनसेनं दिलीये.
या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
छत्रपती श्री. उदयनराजे भोसले ह्यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना राजमुद्रा भेट दिली. #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/JCud0dMAmX
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 27, 2021
थोडक्यात बातम्या-
आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना राजेश टोपेंनी दिला हा कानमंत्र; म्हणाले…
‘तो एकटा निघाला…’, अमोल कोल्हेंनी शरद पवारांवर लिहिली ‘ही’ खास कविता
धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी
“चुकीचं काम केल्यास शिक्षा व्हायलाचं हवी, मगं चुकी करणारे उदयनराजे का असेना”
‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका
Comments are closed.