बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कटोरा घेऊन बसले रस्त्यावर

सातारा | भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला विरोध केला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केलं आहे. भीक मांगो आंदोलनात जमा केलेले 450 रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही, असं उदयनराजे म्हणालेत.

सणासुदीचे दिवस आल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. बँकेचे हप्ते भरायचे आहेत, उद्यापासून नो लॉकडाऊन जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

तुम्ही सगळं बंद करून उपासमारीची वेळ आणली आहे. आज जी परिस्थिती आली आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली.  मी दुकानदार अथवा व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही तर सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! जिवंत रुग्णाचा दिला मृत्यू दाखला; निष्काळजीपणाचा कळस

“देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या”

‘गुरू VS शिष्य’ सामन्यात कोण ठरणार सरस? ; ‘या’ युवा खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष

‘…आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंतच ठाकरे सरकार चालणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More