महाराष्ट्र सातारा

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले

सातारा | आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल तरीही मला त्याबाबतची जास्त समज आहे. माझा अभ्यास कमी असेल पण ज्यांचा याविषयी अभ्यास आहे त्यांनी आरक्षण का मिळालं नाही याचं उत्तर द्यायला हवं. मला तर याबाबत उत्सुकता आहे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी असल्याचं छगन भुजबळ म्हणाले होते. याला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं.

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, असं म्हणत उदयनराजे यांनी छगन भुजबळांना टोला लगावला आहे.

दरम्यान, गुन्हेगारी व अत्याचार, बलात्काराबाबत कडक कायद्याची गरज आहे आणि कायद्याबाबत भीती गुन्हेगारांना असली पाहिजे. बलात्कारासारख्या घटना कदापि कोणाविषयी होऊ नयेत, असं उदयनराजे भोसले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

क्रूरतेचा कळस! पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार मारलं

‘बर्गरकिंग’चे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार तीनच दिवसात बक्कळ मालामाल!

आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही- ममता बॅनर्जी

“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या