बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

सातारा | प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.

व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसं ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असं उदयनराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More