थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा…- उदयनराजे भोसले
सातारा | वीजबिलाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. थकित वीज बिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजेंनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.
कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर वीज थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापी मान्य करता येणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजुने ठाम उभे राहणार आहोत, असं उदयनराजेंनी सांगितलं.
कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असं उदयनराजेंनी साांगितलं आहे.
दरम्यान,कोरोना काळात देखील वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचं वाखाणण्यासारखं काम केलं आहे, असंही उदयनराजेंनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
ईडीची मोठी कारवाई! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त
रघुराम राजन यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…
10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल
नितेश राणेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप सिद्ध करावेत, अन्यथा…- वरूण सरदेसाई
…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!
Comments are closed.