महाराष्ट्र मुंबई

‘महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यामुळे…’; शिवजयंतीवर उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावरून भाजपने सरकारवर निशाणा साधलाय. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9’ मराठीशी बोलत होते.

कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. पण आपल्या लोकांची काळजी घेणं ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जवाबदारी आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे या वर्षीची शिवाजी महाराजांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…

पूजा चव्हाणच्या कुटुंबाला आम्ही भेटू शकत नाही, कारण…- नीलम गोऱ्हे

‘न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणं म्हणजे…’; रंजन गोगोई यांचं धक्कादायक वक्तव्य

‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या