Top News महाराष्ट्र सातारा

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

सातारा | राज्यात औरंगाबादच्या नामंतराचा वाद चांगलाच पेटलेला दिसत आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची शिवसेनेची आग्रही भूमिका तर काँग्रेसचा विरोध त्यामुळे यावरून मोठा संघर्ष पेटलेला असताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादचे नामांतरण करताना राज्यात उद्रेक होणार नाही याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय लोकच घेतील. बॉम्बेचे मुंबई केले तसे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय लोक भावनेतूनच व्हावा, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे केवळ राजे होते म्हणून ते ओळखले जात नाहीत. जसे ते आमचे पूर्वज आहेत तसेच त्यांचा इतिहास वाचला तर त्यांची कर्तबगारी, हुशारी, निर्णयक्षमता आणि लोकहिताच्या निर्णयामुळे ते ओळखले जात असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

‘रिया चक्रवर्ती माझी..’; रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं त्या फोटोबाबत दिलं स्पष्टीकरण, म्हणाला….

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या