निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर!

Udayanraje Bhosale | सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) चांगलेच चर्चेत असतात. सातारा लोकसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत उदयनराजेंना असंख्य मतांनी पराभव स्विकारावा लागत होता. मात्र यंदाच्या वर्षी सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांनी शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवड येथे तसेच साताऱ्यात उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.

निकालाआधीच उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर झळकले

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. दोन्ही ही तुल्यबळ उमेदवार होते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. एका बाजूला माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. तर दुसरीकडे उदयनराजे यांना गादीचा मान आहे. दोघांमध्ये झालेल्या लढतीचा निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच उदयनराजे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत. पिंपरीतील खंडोबा माळ येथे बॅनरबाजी करण्यात आली असल्याचं दिसत आहे. (Udayanraje Bhosale)

Udayanraje Bhosale : पिंपरी चिंचवडमध्ये तर थेट साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर

पिंपरीत याआधी ‘या’ उमेदवारांची बॅनरबाजी

दरम्यान पिंपरी चिंचवड येथे याआधी अमोल कोल्हे, संजय वाघेरे, श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर् झळकवण्यात आले होते. तसेच याआधी पुणे-बेंगळुरू हायवे ता. भोर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकवण्यात आले होते.

सातारा लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे. मात्र निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. तेव्हा विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सातारा हा बालेकिल्ला आहे. भाजपने अनेक वर्षांपासून सातारा बालेकिल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न सरू ठेवले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सभा झाल्या. याचा कितपत परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांवर होईल हे निकालादिवशीच समजेल. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या प्रचारसंभांनी जोर लावला होता. त्याचा अधिक परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलने शशिकांत शिंदे यांच्या बाजूनं निकाल दिला आहे. मात्र येत्या 4 जून रोजी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे समजेल.

News Title – Udayanraje Bhosale Win Satara Loksabha Election Bannerbaaji At Pimpri-Chinchwad

महत्त्वाच्या बातम्या

अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…

बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार

‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट