नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे यांनी लष्कारातील जावान प्रदीप क्षीरसागरला एअर लिफ्ट देऊन एक सुखद धक्काही दिला आहे.
उदयनराजे भोसले हे दिल्लीला गेले होते. तेव्हा प्रदीपने त्यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये बोलणं सुरु असताना उदयनराजेंनी प्रदीपला कुठे निघाला विचारलं. तेव्हा साताऱ्याला निघाल्याचं त्यानं सांगितलं.
उदयनराजेंनी त्याला विचारलं कशाने चालला आहेस, त्यावेळी तो ट्रेनने निघाल्याचं प्रदीपने सांगताच त्यांनी त्याचंही दिल्ली ते पुणे प्रवासासाठी विमानाचं तिकीट बुक करायला सांगितलं.
दरम्यान, उदयनराजेंसोबत प्रदीप दिल्लीहून पुण्यापर्यंत आला. त्यावेळचे फोटो त्याने फेसबुकवर पोस्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
–हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कोंबडीला सोडा
–“अण्णांच्या उपोषणासाठी शुभेच्छा पाठवता का? आम्ही पत्रावर मार्ग काढायचो!”
-अण्णांची प्रकृती ढासळताच सरकारची घाबरगुंडी, गिरीश महाजन निघाले भेटीला
-मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश
–अण्णांनी उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल- डाॅक्टर