बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत’; उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

सातारा | राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. यावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मध्यंतरी संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उमेदवारीवरुन साताऱ्याचे आमदार शिंवेद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते उदयनराजे भोसेले (Udyanraje Bhosale)  यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) कोण मला माहित नाही मी कोणाकडे लक्ष देत नाही पण आम्हाला कोणी काय बोलल तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत, असा इशारा उदयनराजेंनी संजय राऊतांना दिलाय. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

प्रत्येकाला त्यांच्या घराचा स्वाभिमान आहे त्यामुळे कोणी शांत बसणार नाही बाकी काही पेटलं कर बघतोच, अशा शब्दांत उदयनराजेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा उमेदवारीचा निर्णय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे इतरांनी त्यात इतर कोणी चोमडेपणा करु नये भाजपला इतकच वाटत होत तर संभाजीराजेना 42 मते द्यायला पाहिजे होती, असं संजय राऊत शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देताना म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेच्या आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“राज्यातील 50 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे”

“शून्य निर्णयक्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल”

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर, ‘या’ नेत्यांना दिली संधी

“पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More