उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातुन राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याच्या चर्चा रंगत आहेत. त्यात उदयनराजेंनी भाजप नेत्यांची भेट घेतली.

मतदारसंघातील कामे आणि मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं उदयनराजेंच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मतदारसंघातील कामानिमित्त आपण मंत्रालयात येत असतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या भेटी घेत असतो. दुसरे काही नाही, असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-धनंजय… लोकसभेचा विचार करताय की काय?; सुप्रिया सुळेंचा सवाल

-संस्कारी बाबूजी म्हणतात, लैंगिक शोषण झालं पण तो मी नाही!

-एक विवाह ऐसा भी!!! 65 वर्षीय सासऱ्याने केलं 21 वर्षीय सुनेशी लग्न

-लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशाच्या इसमाला अटक

-भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय?; फडणवीस आणि खडसेंचा एकत्र प्रवास

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या