भिडे गुरुजींविरोधात बोलणारांची लायकी नाही- उदयनराजे

नवी दिल्ली | कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांचं समर्थन केलंय. भिडे गुरुजींविरोधात बोलणारांची लायकी नाही, असं ते म्हणालेत. 

भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि तो राहणारच. त्यांनी लहान मुलांचं संघटन केलं. त्यांचा याप्रकरणाशी संबंध नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणी माझ्याशी बोलताना भिडे गुरुजी रडले. उभ्या आयुष्यात राहिले किती वर्ष, माझं कधीही काही होऊ शकतं. मी फक्त लोकांना प्रोत्साहन दिलंस, असं भिडे गुरुंजींनी सांगितल्याचं त्यांनी सांगितलं.