मराठा रस्त्यावर उतरला तर काय होईल? उदयनराजेंचा सवाल

नवी दिल्ली | जातीपातीचं राजकारण अत्यंत दुर्देवी आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरला तर काय होईल याचा विचार करा, अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील जातीय संघर्षावर भाष्य केलं. ते दिल्लीत बोलत होते.

मी कुठलीही जात पात मानत नाही. सर्वांनी एकोप्यानं राहावं, असं आवाहन करताना त्यांनी महार किती टक्के आहेत?, असा सवालही विचारला. 

शिवाजी महाराज, संभाजी महाराज या अत्यंत महान व्यक्ती होत्या. त्यांच्यासमोर आपली लायकी काय? त्यामुळे सगळ्यांनी संयम राखावा. समाजात फूट पडेल असं काही करु नये, असंही ते म्हणाले.