बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चुकीचं काम केल्यास शिक्षा व्हायलाचं हवी, मगं चुकी करणारे उदयनराजे का असेना”

मुंबई | सध्या महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप होत आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री संजय राठोड यांच्यानंतर आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एका उच्च शिक्षित महिलेने आपला छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर या प्रकरणात विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.

अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात सरकारवर निशाणा साधला आहे. चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजे का असेना, असं म्हणत उदयनराजेंनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणात सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज उदयनराजे यांनी कृष्णकुंजावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होतो.

लोकशाहीत सर्व निवडून दिलेले आमदार, खासदार आहेत. सर्वांनी जबाबदारीनं वागायला आणि काम करायला हवं. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. कायद्यात सर्व समान आहेत. असं म्हणत त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना खडेबोल सुनावले. याशिवाय शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असंही यावेळी उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, उदयनराजे कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. या वेळी त्यांच्या मध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. मात्र या चर्चेचा विषय राजकीय नव्हता असं उदयनराजेंनी सांगितलं.  मात्र, यावेळी मुख्यत: मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचेही उदयनराजेंनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका

‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुरु

प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी

‘भारत आणि इंग्लंड आता पुण्यात भिडणार पण…’; बीसीसीआयचा मोठा निर्णय

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More