Top News महाराष्ट्र सातारा

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….”

सातारा | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला निशाण्यावर धरलं आहे.

बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आलेली आहे. मंडल आयोगाच्या वेळी काय घडलं हे प्रत्येकाला माहीत नाही. मुद्दा मी उपस्थित केला असता तर माझ्यावर भडिमार केला असता, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मी आणि संभाजी राजे बघतील असं बोलून बंदूक आमच्या खांद्यावर दिली. मराठा आरक्षण दिरंगाईला सर्व आमदार आणि खासदार जबाबदार असल्याचं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. हा राज्याचा प्रश्न आहे ते राज्याने सोडवला पाहिजे, असंगही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

कोरोना लस कधी येणार माहिती नाही, पण…- राजेश टोपे

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

राहुल गांधी बँकॉकमध्ये कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत- भाजप

जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय, मात्र सरकारकडून सूड बुद्धीने चौकशी- राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या