बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार उदयनराजेंनी जागवल्या वडिलांच्या आठवणी

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे वडिल प्रतापसिंह महाराज (दादा महाराज) यांच्या स्मृतिदिनानिमित्त फेसबुकवर भावूक पोस्ट लिहली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणी जागवल्या आहेत.

प्रतापसिंह महाराज सातारा शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते, त्यांनी जनतेचे प्रश्न आणि अडी अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मी केवळ 12 वर्षांचा असताना प्रतापसिंह महाराजांच निधन झाल्यानं मी पोरका झालो पण आई कल्पनाराजे भोसले आणि राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या जनतेनं त्यांची कमी भासू दिली नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रतापसिंह महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कार्यरत राहणार, असं उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् सुप्रियांना उचलून 5 पायऱ्या चढण्याचा हट्ट सदानंद सुळेंनी पूर्ण केला

-वंदे मातरम आणि मोदी मोदीच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांची महाकुंभमेळ्यात डुबकी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचं पत्रानेच सडेतोड उत्तर

-मोदींच्या रुपाने देशावर आलेली आपत्ती दूर करु- शरद पवार

-लोकसभेची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता; शरद पवारांचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More