गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

मुंबई | गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे अंगारे-धूपारे उडवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे देवी शक्ती आहे असं वक्तव्य केलं होतं, यावरुन उद्धव ठाकरे यांनी हा सल्ला दिला आहे.

देवांना आणि नेत्यांना त्यांचे भगतगण अडचणीत आणत असतात. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र यांच्या बाबतीतही हेच घडत आहे, असंही ते म्हणाले.

ज्या प्रकारचा दबाव मराठा समाजाने निर्माण केला होता त्या परिस्थितीत मराठा अारक्षण नाकारणे ब्रह्मदेवालाही जमलं नसतं, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

-धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा तर विरोधकांचा डाव!

-माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई