Top News विधानसभा निवडणूक 2019

माझं आणि मोदींचं भावा-भावाचं नातं ‘यांना’ डोळ्यात खुपतं; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

मुंबई | माझं आणि पंतप्रधान मोदींचं भावा-भावाचं नातं ‘यांना’ डोळ्यात खुपतंय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.  मला खूप वाईट वाटतं की नरेंद्र भाईंनी मला छोटा भाऊ म्हटलं पण यांना आमचं नातं डोळ्यात खुपतंय. मला खोटं ठरवणाऱ्या लोकांशी मी बोलणार नाही. असा खोटा रिश्ता मला ठेवायचं नाही, असं उद्धव म्हणाले आहेत.

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, असंही उद्धव म्हणाले.

मी भाजपला शत्रूपक्ष मानत नाही. गेल्या पाच वर्षात ते सतत खोटं बोलत आहे, अशी टीका करत लोकसभेत पुन्हा आमच्या गळ्यात अवजड मंत्रीपद बांधण्यात आलं, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अमित शहा व माझ्यामध्ये जे ठरले आहे ते ते नाकारत असतील तर तुमच्या शब्दावर कुणाचा विश्वास नाही, असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या