“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”
हिंगोली | नवनिर्वाचित शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात(Babanrao thorat) आणि काँग्रेसमधून परतलेले माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash wankhede)यांची हिंगोलीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हिंगोलीत गद्दारांविरूद्ध जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदार संतोष बांगर(Santosh bangar), खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde)यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
बबनराव थोरातांच्या सत्कार समारंभात अनेक शिससैनिक उपस्थित होते. सत्कार संमारंभात बोलताना बबनराव थोरात यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला. तसेच जर जिल्हा प्रमुख पद हवं असेल तर गद्दारांच्या गाड्या फोडा, त्यांचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते सत्कार देखील केला जाईल, असं अवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. त्यामुळे हिंगोलीत खळबळ उडाली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात गद्दार गद्दार अशा घोषणा केल्या. तसेच संतोष बांगर आता माझ्या कानाखाली आवाज काढा. एकवेळा नाही हजार वेळा गद्दार म्हणतो, असं म्हणत बांगर यांना देशमुखांनी धारेवर धरलं.
दरम्यान, बबनराव थोरात यांच्या वक्तव्यावर आमदार बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, माझी गाडी फोडणं तर सोडाच नुसता गाडीला टच जरी केलं तरी आमदारकीचा राजिनामा देईल. बबनराव थोरातांनी बीड, नांदेड, हिंगोलीच्या अनेकांकडून लाखो रूपये उकळले आहेत ,त्यामुळेे थोरातांना संपर्क प्रमुख पदावरून हटवले होते, हे उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackray) सुद्धा माहीत आहे, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार बांगर म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन यांचं मोठ वक्तव्य, म्हणाल्या…
‘कोण आदित्य ठाकरे?’, एकेरी उल्लेख करत बंडखोर आमदाराची आदित्य ठाकरेंवर टीका
‘फोन लावण्यासाठी मी पायलटला विमान थांबवायला सांगितलं’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो किस्सा
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला?, चार याचिकांवर सुनावणी होणार
‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
Comments are closed.