शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

मुंबई | शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळी प्रदेशाचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. 

तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचत आहेत, की नाही, याची शहानिशा करण्यासही सांगितलं आहे.

आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथाॅन बैठका होणार आहेत. त्यांनी आज 11 वाजता सेनाभवनात राज्यातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

-महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

-DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!

-आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का

-गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे!