…तेव्हा शिवसेनाप्रमुखांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती???

मुंबई | 1993 च्या दंगलीप्रकरणी 2000 साली वयाच्या 70 व्या वर्षी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कुणी तो कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. 

राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीविषयी ते बोलत होते. मी चोरुनही ती मुलाखत पाहिली नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, शिवसेनाप्रमुख आर्थिक निकषांवर आरक्षण मागत होते तेव्हा त्यांची भूमिका स्वीकारली असती तर आज ज्या जातीच्या भिंती उभ्या आहेत त्या दिसल्या नसत्या. शिवसेनाप्रमुखांचा कुठलाच निर्णय चुकला नाही हे काल सिद्ध झालं, असंही ते म्हणाले.