तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
मुंबई | शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडले. त्यानंतर ते भाजपच्या पाठींब्याने राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना भाजप पक्षांत जोरदार वादांना तोंड फुटले. जेव्हा हा सत्तांतराचा गोंधळ सुरु होता, तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजारी होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. ते आराम करत होते. त्यांना बरे वाटू लागल्यावर त्यांनी सुद्धा भाजपसोबत शिवसेनेला डिवचण्यात उडी घेतली आणि जाहिर मुलाखतीत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
शिवसेना फुटल्यावर बंडखोर आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून वाचण्यासाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे बंधनकारक होते. त्यामुळे काही काळ ते राज ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. ठाकरेंनी सुद्धा तसा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करु असे सांगितले होते. त्यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंवर टीका केली. किती जणांना केमिकल लोचा झाला आहे? असे विचारत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
भोंग्याच्या राजकारणात जेव्हा राज ठाकरे हनुमान चालिसा म्हणत होते, त्यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabahi MBBS) चित्रपटाचा उल्लेख करत केमिकल लोचा झाला आहे, असे म्हणत राज ठाकरेंवर टीका केली होती. चित्रपटात जसे संजय दत्तला महात्मा (Mahatma Gandhi) गांधी दिसायचे तसे काहींना स्वत: बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटते, अशी शाल पांघरून शिवसेनाप्रमुख होता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यालायक माणूस नाही, असे म्हंटले होते. त्यावर काल (दि. 24) रोजी कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केमिकल लोचा झाला असे म्हणत, राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
थोडक्यात बातम्या –
मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर
‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान
‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम
‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा
Comments are closed.