“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

मुंबई | 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर आपला पराभव होऊ शकतो, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच ‘बुलंदशहर’ घडवून आणलं जात आहे का? असा संशय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

गोहत्येचे संशयपिशाच्च लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मंताच्या ध्रुवीकरणाचा तोच रक्तरंजीत पॅटर्न पुन्हा राबवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आलं आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीच्या पूर्वी जसं ‘मुज्जफरनगर’ आणि ‘कैराना’ घडवलं गेलं तसं आता ‘बुलंदशहर’ घडवून आणलं जात आहे का? असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, गोहत्येच्या अफवेमुळे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये हिंसाचार झाला, त्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह एका तरुणाचा बळी गेला.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

Google+ Linkedin