बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा दिनाचे अवचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्रभर मराठी स्वाक्षरी मेहिम राबवण्यात आली. या मोहिमेत अनेक दिग्गज लोकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याेवळी मी मास्क घालत नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होत. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुंबईत पत्रकार परिषद आयेजित केली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत  पत्रकारांनी राज ठाकरे मास्क घालत नाहीत, त्यांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मी त्यांना नमस्कार करतो, अशा मोजक्या शब्दात प्रतिक्रिया देत याविषयी अधिक बोलणं टाळलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे विना मास्क वावरताना दिसले. पत्रकारांनी तुम्ही मास्क घालत नाही का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. यावर मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो असं म्हणत, आपल्या खास शैलीत पत्रकारांना उत्तर दिलं होत.

दरम्यान, मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यापत्रकार परीषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

पूजाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ विनंती

“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…

“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More