बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ विनंती

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत भाष्य केलं. याबाबत बोलताना आज संजय राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक पत्र दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

यावेळी पूजा चव्हाणचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीवेळी आपल्या कुटुंबियांची जी नाहक बदनामी भाजपकडून होत आहे. ती थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी विनंती पत्राद्वारे पूजाच्या कुटुंबियांनी केली असल्याचीचं मुख्यमंत्र्यांनी संगितलं.

याशिवाय संजय राठोड यांनी केवळ नैतिकता बाळगण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी सरकारवर अथवा राठोडांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचंही यावंळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढील चौकशी लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, भाजप सारखा दुतोंडी विरोधी पक्ष आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. सोबतच प्रसार माध्यमांंकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजाच्या कुटुंबियांची आणि बंजारा समाजाची बदनामी होत आहे. ती लवकरात लवकर थांबवावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यावेळी पत्रकार परीषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…

“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात!

संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर

भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड

राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपलं असं होत नाही- प्रविण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More