बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

कोकणावर कोरोना आणि वादळ असं दुहेरी संकट आहे. मी येथे फोटोसेशन करायला आलेलो नाही, नुकसानीची पाहणी करायला आलोय. नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल. कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची हे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते सगळं करणार आहे. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिलं आहे.

दरम्यान, तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. यावेळी राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

थोडक्यात बातम्या- 

पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट कोसळलं; एका पायलटचा मृत्यु, पाहा व्हिडीओ

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

‘गांगुली स्वार्थी होता, त्याला…’; ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

कोरोनानंतर ‘हा’ गंभीर आजार झाल्याची जगातील पहिलीच घटना, डाॅक्टर आणि वैज्ञानिकही अचंबित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More