उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत केलं मोठं वक्तव्य
मुंबई | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावत शिवसेनेशी बंड पुकारले. त्यानंतर अनेकांनी त्यांना समजावून परत येण्याचे आवाहन केले. परंतु शिंदे गट कोणतीच तडजोड करायला तयार नाही. सोबतच सर्व पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर शरद पवार यांनी या बंडामागे भाजप असल्याचे म्हटले आहे.
बंडाअगोदर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीचा उल्लेख ठाकरे यांनी करत मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे म्हणाले, शिंदे यांना भाजपसोबत जायचे आहे. असे त्यांनी मला सांगितले होते. या बंडामागे भाजप आहे, असेही ते म्हणाले. ठाकरे महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते.
मेलो तरी सेना सोडणार नाही, असे म्हणणारेच पळूून गेले. ठाकरे नावातच शिवसेनेची नांदी आहे. ठाकरे नाव न वापरता शिवसेना चालवून दाखवा, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता शिवसेना चालवून दाखवा, लोकांमध्ये वावरून दाखवा, असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी केला. एकनाथ शिंदे यांना मी महत्वाचे नगरविकास खाते दिले. वास्तविक हे खातं मुख्यमंत्र्यांकडे असतं पण मी मोह केला नाही. ते शिवसेना फोडण्याचे पाप करत आहेत, असंही ठाकरे पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना स्पष्ट सांगितले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा देखील आरोप केला आहे.
थोडक्यात बातम्या –
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”
“…त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेत स्वार्थ साधला”
“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”
उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!
‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले
Comments are closed.