महाराष्ट्र मुंबई

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

मुंबई | केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जे जे कोणी या युद्धात उतरुन काम करत आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. या सर्वांच्या सोबतीने आपण हे युद्ध लढत आहोत. आपण घरी बसून आहात, गैरसोय होतेय मला माहिती आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण घरी राहणंच योग्य आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 4 आठवडे झाले, मुंबई-पुण्यात पहिला रुग्ण सापडून. रुग्णात वाढ होत आहे, मला ती नको आहे. ती खाली आणायची आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या