बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“40 हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव, माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार”

मुंबई |  महाराष्ट्रात 40 हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव ठेवणार आहे. जे लोक नवीन ग्रीन उद्योग सुरु करु इच्छित असतील जे कोणतेही प्रदूषण करणार नाही त्यांना कोणत्याही अटी नाहीत. त्यांनी आता उद्योगासाठा पुढं यावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्राशी संवाद साधत आहेत.

ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे. मला आशा आहे की जसं आपल्या मराठी तरूणांनी कोरोनापासून वाचण्यासाठी घरी राहून प्रशासनाला सहकार्य केलं तसंच मी आता ते महाराष्ट्राला वाचवण्यााठी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार या निश्चियाने बाहेर पडतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझा महाराष्ट्र मोदींच्या भाषेत आत्मनिर्भर करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे हे तरुणांनी देशाला दाखवावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसंच कामगार परराज्यात गेले आहेत, आता भूमिपुत्रांना आवाहन आहे, जिथे जिथे ग्रीन झोनमध्ये, तिथे आत्मनिश्चयाने बाहेर पडा, असंही ते म्हणाले.

आपल्यासमोर दोन मोठी आव्हानं आहेत एक तर ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही. तर दुसरं रेड झोनला ग्रीन झोन करायचं आहे. त्या कामी आपण प्रशासनाला मदत करा, असं ते म्हणाले.

ट्रेडिंग बातम्या-

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही – उद्धव ठाकरे

कोरोना रूग्णांसाठी मुंबईत 1 हजार बेड्सचं रूग्णालय; सरकारकडून महापालिकेकडे सुपूर्द

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला- सदाभाऊ खोत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More