मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेना राजकीय घडामोडींवर परखड भाष्य करत असते. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर देखील शिवनेनेने अनेकदा सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून हल्ला केला जात होता.
सामनाचे पुर्वीचे संपादक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची असल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. या पदावर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या रुजू झाल्या होत्या. मात्र, सामनाच्या संपादकपदी उद्धव ठाकरे पुन्हा रुजु झाले आहेत.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे. सत्तांतर झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत. कोणत्याही सांविधानिक पदावर नसल्याने आता ते सामना मध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना हे समीकरण सगळ्यांना ज्ञात आहे. यामुळे आता पु्न्हा एकदा भाजपवर (BJP) टीकेची झोड उठणार यात काही शंका नाही. उद्धव ठाकरे आता सामनात काही नवीन बदल करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!
मोठी बातमी! राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ
आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का
उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका
‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे
Comments are closed.