मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत वेगळा गट तयार केला आणि भाजपशी संयुक्त आघाडी करत, सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांची शिवसेनेतून गटनेते पदावरून हाकलपट्टी करण्यात आली. त्यांनी आपल्यासोबत असलेले आमदार म्हणजे खरी शिवसेना असा दावा केला. तसेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर देखील दावा करत कायदेशीर लढाई सुरु केली.
महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. चिन्हाची कायदेशीर लढाई जरी न्यायालयात सुरु असली तरी, गाफील राहून चालणार नाही. कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने जर कायद्याच्या लढाईत अपयश आले तर गाफील न रहाता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल, ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, आणि कामाला लागा. असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली. त्या मागणीला आव्हान करत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आता 11 जुलै रोजी निकाल अपेक्षित आहे. शिवसेेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये आणि शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे याकरीता शिंदे गट आणि भाजप प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहे.
शिवसेना पक्षात मोठी गळती सुरू असून सेनेचे आमदार व नगरसेवक मोठ्या संख्येने शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे शिवसेना सतत बैठकांचे सत्र चालवून आपला किल्ला मजबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
थोडक्यात बातम्या –
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर
मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
Comments are closed.