नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ठाकरे-मोदींच्या या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
उद्धव ठाकरे गुरुवारी नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मोदींची भेट घेत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेतली आहे. शिवाय आज रात्री ते गृहमंत्री अमित शहा यांचीची भेट घेणार आहेत. त्यांच्या या भेटीगाठीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे महाराष्ट्रासमोरील प्रमुख मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार असल्याचं कळत आहे. मात्र, भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर होणाऱ्या या भेटीमुळे विविध चर्चा होऊ लागल्या आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभेवर पाठवण्यास संजय काकडेंना आक्षेप
देशातील 25 सक्षम महिलांच्या यादीत नवनीत राणा यांचा समावेश
महत्वाच्या बातम्या-
वारिस पठाणांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं- विश्व हिंदू परिषद
अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा…- रामदास आठवले
सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह
Comments are closed.